पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कंपनीतून कामावरुन कमी केल्याच्या रागातून एका तरुणाने तरुणीच्या फोनवर अश्लिल मेसेज (Pornographic message) केला. तसेच कंपनीत तरुणीची बदनामी केली. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात (vimantal police station) फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) सिनीओरिटी प्रा. ली. कंपनीत (Seniority Pvt. Ltd. Company) आणि तरुणीच्या राहत्या घरी घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रेयक अग्रवाल Shreyak Agarwal (वय-30 रा. प्राईड वल्ड सिटी, धानोरी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकाच कंपनीत कामाला होते. कंपनीत काम करत असताना श्रेयक याचे वागणे फिर्यादी यांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला कंपनीतून काढून टाकले.
आरोपी श्रेयक याचे वागणे फिर्यादी यांना आवडले नसल्याने त्यांनी त्याला इन्स्टाग्राम (Instagram),
फेसबुक (Facebook) व लिंकडीन (LinkedIn) या सोशल मीडिया साईवर ब्लॉक केले.
आरोपीने तरुणीला अपरात्री फोन करून ट्रु कॉलरवर अश्लील मेसेज केला. तसेच तरुणीची कंपनीत बदनामी केली.
तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रेयक अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उप निरीक्षक जोगन (PSI Jogan) या करीत आहेत.
Web Title : Pune Crime | FIR against Shreyak Agarwal
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update