नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळण्याच्या संख्येत सतत घट नोंदवली जात आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात सुमारे 26,567 प्रकरणे आली आणि 385 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हे आकडे मागील 5 महिन्यांतील सर्वांत कमी आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या 4.10 टक्के केस अॅक्टिव्ह आहेत, तर 94.45 टक्के प्रकरणात डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच 1.45 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.
मंत्रालयानुसार, देशात सध्या 3,83,866 अॅक्टिव्ह केस, तर आतापर्यंत 91,78,946 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर 1,40,958 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात देशात 39,045 लोक बरे झाले, तर अॅक्टिव्ह केसच्या संख्येत 12863 ची घट झाली आहे. तसेच 385 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात सध्या 97,03,770 प्रकरणे आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने सांगितले की, सोमवारी देशात 10,26,399 लोकांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत देशभरात 14,88,14,055 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
राज्यांमधील मागील 24 तासांतील आकडेवारी
झारखंड – 2 मृत्यू, 179 नवी प्रकरणे
छत्तीसगढ – 1423 नवी प्रकरणे, 15 मृत्यू
पंजाब – 19 मृत्यू, 620 नवीन रुग्ण
मध्य प्रदेश – 1307 नवी प्रकरणे, 10 मृत्यू
हरियाणा -1,392 नवी प्रकरणे, 23 मृत्यू
कर्नाटक – 998 नवी प्रकरणे, 11 मृत्यू
केरळ – 3,272 नवी प्रकरणे, 23 मृत्यू
आंध्र प्रदेश – 316 नवी प्रकरणे, 5 मृत्यू
गोवा – 90 नवी प्रकरणे, 3 मृत्यू
बिहार – 2 मृत्यू, 585 नवी प्रकरणे
गुजरात – 1,380 नवी प्रकरण, 14 मृत्यू
राजस्थान – 1,927 नवी प्रकरणे, 19 मृत्यू
जम्मू काश्मीर – 280 नवी प्रकरणे, 9 मृत्यू