Kangana on Bharat #BharatBandh : कंगनानं भारत बंदच्या विरोधात केलं Tweet ! म्हणाली…

kangana ranaut

बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा ती वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्येदेखील करत असते. गेल्या काही दिवसांपासून ती शेतकरी आंदोलनाला विरोध करताना दिसत आहे. आज (मंगळवार, दि. 8 डिसेंबर 2020) शेतकऱ्यांनी भारत बंद (#BharatBandh) ठेवला आहे. कंगनानं आता भारत बंदच्या विरोधात ट्विट केलं आहे, जे सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. यात तिनं सद्गुरूंचा एक व्हिडिओदेखील शेअर केला होता, ज्यात ते प्रोटेस्टबद्दल बोलताना दिसत आहेत.

एक व्हिडिओ रिट्विट करत कंगनानं लिहिलं की, या भारत बंद करूयात. या नावेला वादळांची कमी नाही, परंतु कु्ऱ्हाड द्या काही बिळंही पाडूयात. रोज इथं अपेक्षांचं मरण होत आहे. देशभक्तांना सांगा एक तुकडा आता तुम्हीही मागा. रस्त्यावर आणि तुम्हीही धरणे द्या. चला आज किस्साच संपवून टाकू.

कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी तिला सपोर्ट केला आहे तर काहीजण मात्र तिच्यावर टीका करत आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवीमध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.