नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या 24 तासातील रुग्ण संख्येने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात 954 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
954 new #COVID19 positive cases, 1784 recovered/discharged/migrated & 35 deaths reported in Delhi today. The total number of positive cases now rises to 1,23,747 including 1,04,918 recovered/discharged/migrated and 3,663 deaths: Government of Delhi pic.twitter.com/i9fmgHLWFz
— ANI (@ANI) July 20, 2020
दिल्लीत संक्रमित रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 747 वर पोहचली आहे. आज (सोमवार) 1784 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत आतापर्यंत 1 लाख 4 हजार 918 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोरोना विषाणूमुळे राजधानी दिल्लीत आतापर्यंत 3663 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये सध्या 15166 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी 4177 आरटी-पीसीआर चाचण्या आणि 7293 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 8 लाख 30 हजार 459 चाचण्या करण्यात आल्या आहे. दिल्लीमध्ये सध्या 696 कंटेन्मेंट झोन आहेत.
दरम्यान, 27 मेनंतर दिल्लीत पहिल्यांदाच 24 तासात एक हजाराहून कमी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एकूण 8379 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. दिल्लीचा रिकव्हरी रेट 84.78 टक्के आहे तर मृत्यू दर 2.86 टक्के आहे.