न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची वॅक्सीन आणि औषधासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. तमाम देशांचे शास्त्रज्ञ औषध आणि वॅक्सीनसाठी काम करत आहेत, ज्यामुळे सतत नवनवीन माहिती समोर येत आहे. आता दोन शास्त्रज्ञांनी स्टडीनंतर म्हटले आहे की, कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या औषधाने कोरोना रूग्णांवर उपचार होऊ शकतो.
जेरूसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर याकोव्ह नहमियास आणि न्यूयॉर्क इकाहन स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. बेंजामिन टेनओवर मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या औषधासाठी स्टडी करत होते. लॅबमध्ये करण्यात आलेल्या स्टडीदरम्यान, कोलेस्ट्रॉल घटवण्याचे औषध फेनोफायब्रेट (ट्रिकॉर) चे खुप सकारात्मक परिणाम दिसून आले.
प्रोफेसर नहमियास आणि डॉ. टेनओवर यांनी स्टडीदरम्यान आपले लक्ष या गोष्टींवर केंद्रीत केले होते की, कशाप्रकारे कोरोना व्हायरस रूग्णांच्या फफ्फुसांना प्रभावित करतो. शास्त्रज्ञांना दिसून आले की, व्हायरस कार्बोहायड्रेटच्या रुटीन बर्निंगला रोखतात. यामुळे जास्त प्रमाणात फॅट फफ्फुसांमध्ये जमा होते.
डेली मेल आणि मेडिकल एक्सप्रेस डॉट कॉममध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, दोन्ही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या स्टडीतून हे समजण्यास मदत होऊ शकते की, हाय ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हलचे कोरोना रूग्ण हाय रिस्क कॅटेगरीमध्ये का जातात.
स्टडीनुसार, फेनोफायब्रेट औषधाच्या वापराने फफ्फुसांच्या पेशी जास्त फॅट बर्न करतात आणि यामुळे कोरोना व्हायरस कमजोर पडतो आणि स्वत:ला रिप्रोड्यूस करू शकत नाही. लॅब स्टडीदरम्यान, केवळ 5 दिवसात ट्रीटमेंटनंतर व्हायरस नष्ट झाले.