अलिगढ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये 28 दिवसांत 84 डॉक्टरांच्या जेवणाचे बिल तब्बल 50 लाख आले आहे. अतिरिक्त वैद्यकीय मुख्य सचिव डॉ. रजनीश दुबे यांना हे बिल पाहून धक्का बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने हे बिल भरण्यास नकार दिला आहे.
शहरातील चार हॉटेल्स जिल्हा प्रशासनाद्वारे पाम ट्री डेव्हलपमेंट हॉटेलमार्फत उघडण्यात आली आहेत. त्यामध्ये कोरोना योद्धा म्हणजेच डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शहरातील चार हॉटेलमध्ये 84 डॉक्टरांना 28 दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे.
मात्र जिल्हा प्रशासनाने मार्चपासून कोणत्याही हॉटेल चालकाला थकबाकी दिली नाही आहे. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मानव महाजन यांनी सांगितले की, 50 लाख रुपयांची थकबाकी असून जिल्हा प्रशासनाने मार्चपासून पैसे भरले नाही आहेत. थकबाकी लवकरात लवकर न मिळाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे म्हटले आहे. यावर अलिगडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भानु प्रतापसिंह कल्याणी यांनी सांगितले की, 50 लाख रुपये भरण्यासाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल असे म्हटले आहे.