बहुजननामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या 50 लाखांच्या जवळ पोहचली आहे. 24 तासात कोरोनाचे 83 हजार 809 नवे रूग्ण सापडले आहेत. यासोबतच संक्रमितांची एकुण संख्या 49 लाख 30 हजार 237 झाली आहे. तर, एका दिवसात 1 हजार 54 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे, ज्यानंतर मृत्यूंची एकुण संख्या सुद्धा 80 हजारच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 80 हजार 776 लोकांनी या व्हायरसमुळे जीव गमावला आहे.
कोरोना प्रभावित प्रमुख राज्यांची स्थिती
महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाची 17 हजार 66 नवी प्रकरणे समोर आली. 15 हजार 789 डिस्चार्ज झाले आणि 257 मृत्यू झाले. राज्यात एकुण प्रकरणांची संख्या वाढून 10 लाख 77 हजार 374 झाली आहे. यामध्ये 7 लाख 55 हजार 850 लोक बरे झाले, तर 2 लाख 91 हजार 256 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.