बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 247 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील 16 जणांचा आज मृत्यू (Coronavirus)झाला आहे. पुण्याबाहेरील 7 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 4 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 280 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 1 लाख 62 हजार 91 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 52 हजार 169 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 5 हजार 647 एवढी आहे. एकूण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 528 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 316 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.