नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसकची भीती वाढली असून अनेक मोठे अभिनेते हात मिळण्याऐवजी भारतीय संस्कृतीचा आसरा घेत एकमेकांना नमस्ते करत आहेत. याचे उदाहरण अलीकडेच पाहायला मिळाले असून डोनाल्ड ट्रम्पपासून प्रिन्स चार्ल्सपर्यंत नमस्ते करताना दिसले आहेत.
गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये वॉशिंग्टनच्या यात्रेनिमित्त गेले असताना आर्यलँडचे पंतप्रधान लियो वराडकर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकमेकांना नमस्ते करताना दिसले. तिथे उपस्थित असलेले भारतीय वंशाचे वराडकर यांनी हात जोडत नमस्कार केला आणि पत्रकारांना दाखवले कि त्यांनी कसे राष्ट्रपतींचे अभिवादन केले. यानंतर ट्रम्प यांनीही हात जोडून नमस्कार केला.
ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्सही नमस्कार करताना दिसून आले. ११ मार्चला लंडनमध्ये त्यांना नमस्कार करत लोकांना अभिवादन करताना दिसले. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे शाही परिवारही सावधगिरी बाळगत आहेत, अशी माहिती मिळत आहे. इज्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे म्हणाले की, कोरोनाला थांबवण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. तसेच सगळ्यांना भारतीय पद्धत वापरली पाहिजे आणि एकमेकांना नमस्कार केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
विषाणूचा प्रादुर्भाव पाहता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी स्पेनचे राजा आणि राणीला वेगळ्या प्रकारे अभिवादन केले. इम्यॅन्युलअने नमस्ते करत दोघांचे स्वागत केले. याशिवाय इतर अनेक ठिकाणी इमॅन्युएल मॅक्रॉन देखील नमस्ते करताना दिसले.
मागच्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खाननेही आपल्या चाहत्यांना कोरोना विषाणूमुळे नमस्ते करण्याचा सल्ला दिला. जिममध्ये त्याने एक फोटोही इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. तसेच अभिनेता अनुपम खेरनेही आपल्या चाहत्यांना ट्विटरवरून शेकहँडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, कोरोना व्हायरस रोगाचा संसर्ग टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नमस्कार. अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर नमस्कार करण्याचा सल्ला दिला.