नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस आता १०० पेक्षा जास्त देशात पसरला असून १.२ कोटीपेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे आणि तब्बल ४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजाराला महामारी घोषित केले आहे. अजूनतरी यावर कोणता उपचार आलेला नसून औषध व्हायला पुढचे वर्ष लागेल. सावध राहणे हाच एक पर्याय आहे. जगात शेअर बाजाराला धक्का बसला आहे.
उत्पत्ती कशी झाली ?
२०१९ च्या शेवटच्या महिन्यात चीनच्या वुहान शहरात याच्या प्रकोपाला सुरुवात झाल्यावर चीनने याबाबतच्या बातम्यांना दाबायला सुरुवात केली. जेव्हा डोक्यावरून पाणी जाऊ लागले तेव्हा त्यासाठी योग्य उपचार आणि निदानासाठी पाऊल उचलायला सुरुवात झाली. २३ जानेवारीला वुहान इन्स्टिटयूट ऑफ वायरोलॉजीच्या कोरोना व्हायरसचे विशेषतज्ञ् शी झेंग ली यांनी कोविड-१९ ची जीनोम सीक्वेंसिंग वटवागूळमध्ये सापडलेल्या व्हायरसला ९६.२ टक्के मिळत असून आणि मागचे काही दिवस सार्स पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसने ७९.५ टक्के मिळतो.
चायनीज मेडिकल जर्नलच्या शोधात या व्हायरसचा जीनोम अनुक्रमे ८७.६ ते ८७.७ टक्के चिनी प्रजातीच्या आणखी एका वाटावागूळाशी मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्यातरी या माहितीला कोणताही पुरावा मिळाला नसून छोट्या प्राण्यामुळे हा आजार पसरला आहे.
वटवागूळामध्ये विशिष्ट व्हायरस
– वटवागूळ हे ६० वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसचा भांडार आहे.
– त्याच्यातून येणारे विषाणू काही गंभीर प्रकारचे आजार पसरवतात.
– ते आपापसात खूप जवळ असतात ज्यामुळे व्हायरस सहजपणे दुसऱ्यापर्यंत जाऊ शकतो.
पाच डझन व्हायरसचे वटवागुळ सुरक्षितपणे कसे जगतात? तज्ञांच्या मते, शारीरिक कार्य सतत उडण्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला बळकट बनवते. त्यांची प्रभावी प्रतिरक्षा प्रणाली त्यांना अशा धोकादायक व्हायरससह जगण्यात मदत करते. व्हायरस आणखी मजबूत बनवण्यात त्यांची गुणवत्ता देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
पर्यावरणाच्या बाबतीत वटवागूळ महत्वपूर्ण आहेत. जगभरात त्यांच्या १३०० प्रजाती असून समस्त सस्तनधारक प्राण्यांपैकी वीस टक्के आहे. मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच प्राणी आपल्याजवळ आहेत.
भयानक विषाणूंचा भांडार आहे वटवागूळ –
जूनोटिक रोगाचा विषाणू सामान्यपणे एका विशिष्ट प्रजातीवर अवलंबून असून इतरांना संक्रमित करणारे जवळजवळ सर्व विषाणू मानवासाठी हानिकारक नसतात. इतर प्रजातींसाठी अतिसंवेदनशील अशा विषाणूंची संख्या खूपच कमी आहे. जरी सर्व जूनोटिक रोगांना गंभीर आजाराचा धोका नसून न्यू सायंटिस्ट जर्नलमध्ये जगभरात विकल्या आहेत. दरवर्षी २.५ अब्ज लोकं त्याने आजारी पडतात. तसेच २७ लाख लोकं मारले जातात.
पांगोलिन देखील वाहक –
कोरोना व्हायरस पांगोलिन मध्येही सापडला गेला आहे. जगभरात जास्त तस्करी याच जीवाची होते. याच्या त्वचेपासून परंपरागत चिनी औषध तयार केले जाते.
असे संक्रमित होत आहेत माणसं –
खूप काळापासून कोरोना व्हायरस परिवाराकडून संसर्ग होत असून या परिवाराकडून व्हायरसचे सर्दी-ताप सारखे छोटे-मोठे रोग होतात आणि यांच्या सदस्यांकडून मर्स, सार्स सारखी गंभीर महामारी पसरते. २०१९ च्या शेवटच्या महिन्यात निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसचा आणावीं स्ट्रेन या परिवाराचा सातवा संस्करण आहे. प्रतिबंध करण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नाही. तथापि, या व्हायरसच्या कार्याचे परीक्षण करून, त्याच्या प्रतिबंधाबद्दल इलाज विकसित करू शकतो.