बहुजननामा ऑनलाईन टीम : गेल्या दोन-तीन वर्षांपासून कॉंग्रेसला निधीची कमतरता भासत असल्याचे काँग्रेस सांगत आहे. मात्र, पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीवरून कॉंग्रेसने प्रचारासाठी शंभर कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले असल्याचे दिसून आले आहे. कॉंग्रेसने लोकसभा निवडणूक २०१९ आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीत ८२० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहेत.
२०१४ च्या तुलनेत या वेळी पक्षाने अधिक रक्कम खर्च केली. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसने ५१६ कोटी रुपये खर्च केले. २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने ७१४ कोटी रुपयांचा खर्च दर्शविला होता. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकांच्या खर्चाचा तपशील भाजपने अद्याप दिला नाही.
कॉंग्रेसने ३१ ऑक्टोबरला आपला तपशील निवडणूक आयोगाला सादर केला. पक्षाने आपल्या प्रचारासाठी ६२६.३ कोटी रुपये, तर उमेदवारांवर १९३.९ कोटी रुपये खर्च केले. निवडणुकीच्या घोषणेपासून प्रक्रियेच्या समाप्तीपर्यंत कॉंग्रेसने एकूण ८५६ कोटी रुपये खर्च केले. अन्य पक्षांबद्दल बोलताना तृणमूल कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत ८३.६ कोटींची गुंतवणूक केली. बहुजन समाज पक्षाने ५५.४ कोटी, राष्ट्रवादीने ७२. ३ कोटी आणि ७१. १ लाख रुपये खर्च केले.
Visit : bahujannama.com