मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नुकतीच मुंबईत भेट घेतल्याने विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येणार आहेत काय ? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केला आहे.
या गोष्टीबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजून काहीही खुलासा केलेला नसून त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याची तयारी केली असल्याची चर्चा मात्र सुरु आहे. यावर ‘काही नेते पुन्हा पक्षात येणार असून त्यांचे स्वागत करायला हवे’, अशीही प्रतिक्रिया अमित देशमुखांनी केली आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात बैठकी दरम्यान देवेंद्र फडणवीस, भाजपमधील नाराज माजी आमदार आणि विखे पाटील उपस्थित होते. अहमदनगमध्ये त्यासाठी आज पून्हा बैठक घेतली जाणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये असून विखे पाटील यांची पत्नी शालिनी विखे पाटील या अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत.
Visit : bahujannama.com