मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपला कमी जागा मिळाल्याने बार्गेनिंग पावर वाढलेल्या शिवसेनेने सत्तेमध्ये समान वाट्याची मागणी केली आहे. मात्र भाजपने हि मागणी मान्य न केल्यास आमच्याकडे दुसरे पर्याय उपलब्ध असल्याची धमकी देखील शिवसेनेने दिली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना डिवचण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
याचसंदर्भात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपल्या शिष्टमंडळासह काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट होणार असून यामध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते असणार आहेत. सध्या सत्तास्थापनेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात आपण मदत करू अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
जर सत्तेमध्ये योग्य वाटा मिळाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होऊ शकत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मतमोजणी होऊन आठवडा उलटल्यानंतर देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये नक्की काय सुरु आहे याची माहिती समोर येत नसल्यामुळे आणखीनच संभ्रम निर्माण होत आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून येत असणाऱ्या सततच्या विधांनमुळे नक्की आलबेल आहे का ? असा प्रश्न देखील सर्वांना पडत आहे.
दरम्यान, पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने यामध्ये आणखीनच भर पडली आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असं काहीही ठरले नसल्याचे त्यांनी म्हटल्याने आता आक्रमक झालेली शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –