नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या (14.2 किलो) किमतीत तब्बल 77 रुपयांची वाढ झाली असून आता सिलेंडरची किंमत 716.50 रुपये एवढी झाली आहे.
यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडर 639.50 रुपयांना मिळत होता. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (19 किलो) किमतीत 119 रुपयांची वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांना आता तो सिलेंडर 1288 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी तो 1169 रुपयांना मिळत होता. दरम्यान, 5 किलोचा लहान सिलेंडरचा भाव 264.50 पर्यंत पोहचला आहे. वाढलेले भाव हे शुक्रवार सकाळपासून लागू होणार आहेत.
स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 3 महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 105 रुपयांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये 193 रुपयांची वाढ झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडर 611.50 रुपयांना तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 1095 रुपयांना होतं. महागाईचा भडका उडल्यामुळं सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्यानं इतर वस्तूंच्या किंमतीत देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
14.2 किलो – 716.50 रुपये
19 किलो – 1288 रुपये
5 किलो – 264.50 रुपये