नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर पक्षाने त्यांना उत्तर मुंबईतून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उर्मिला मातोंडकर आता उत्तर मुंबईतून लढणार आहेत. त्यांनी नुकताच कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तत्पुर्वी त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होतीच.
दोन दिवसांपुर्वी ऊर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये राहूल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची उमेदवारी कॉंग्रेसने आज जाहीर केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उर्मिला मातोंडकर या भाजपाचे विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांना टक्कर देणार आहेत.
Urmila Matondkar to contest from Mumbai North parliamentary constituency on a Congress ticket. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/LrzBiAa5QF
— ANI (@ANI) March 29, 2019