मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे ( MP Sambhaji Raje) राज्यव्यापी दौऱ्यावर असून अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी 6 जूनपर्यंतचा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यासाठी, 5 महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन संभाजीराजेंनी दिले आहे. आता, नाशिकमध्ये बोलताना, मिळेल ते वाहन पकडून राज्याभिषेक सोहळ्यादिवशी 6 जूनला रायगडावर येण्याचे आवाहन संभाजीराजेंनी मराठा बांधवांना केले आहे.
महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सोमवारी (दि. 31) खासदार संभाजीराजेंनी नाशिकच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. तसेच, 2 जून रोजी नाशिकमध्ये बैठकीचेही आयोजन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेतेे देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजे सिंधुदुर्गात गेल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा आरक्षणावर 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यावेळी आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली होती. मराठा समाजाला संयम राखण्याचा सल्ला मी दिला होता. त्यामुळे राज्यात उद्रेक झाला नाही, असे ते म्हणाले. मात्र, 6 जूनपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा न काढल्यास रायगडावरुनच घोषणा होईल, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला होता. दरम्यान कोरोनामुळे जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. काही जिल्ह्यात शिथिलता मिळत असली तरी, 15 जूनपर्यंत जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी बंदीच घातली आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे आवाहन संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.
2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती
लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या
शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
शेतीचा वाद ! शिरूर तालुक्यात 13 जणांकडून 5 जणांवर कुर्हाडीने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न