जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (दि.31 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आज थेट एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. जळगावातील मुक्ताईनगर येथे असलेल्या एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी फडणवीस गेले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच खडसे यांच्या घरी गेले. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील होते.
देवेंद्र फडणवीस यांनी कालच शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ते आज थेट जळगावात रक्षा खडसेंच्या भेटीसाठी पोहचले आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस आणि महाजन हे पहिल्यांदाच जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आले आहेत. फडणवीसांनी यावेळी मुक्ताईनगर मधील ग्रामीण रुग्णालयाची देखील पाहणी केली. तसेच वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या पक्ष बांधणीसंदर्भात फडणवीस हे रक्षा खडसे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यात मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या आजी-माजी दहा नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि रक्षा खडसे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेतीचा वाद ! शिरूर तालुक्यात 13 जणांकडून 5 जणांवर कुर्हाडीने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत
Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध
केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू