मनमाड : बहुजननामा ऑनलाईन – केमिकल टॅंकर आणि आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांना अचानक पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहने जळून खाक झाली असून दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मनमाड-मालेगाव मार्गावर(Manmad-Malegaon road) कौळाने जवळ सोमवारी (दि. 31) रात्री ही घटना घडली आहे. अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावरील(Manmad-Malegaon road) वाहतूक 3 तास खोळंबली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केमिकल टँकर पुण्यातून राजस्थानकडे जात होता. तर आयशर ट्रक मनमाडकडे येताना हा भीषण अपघात झाला. घनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावरील सुमारे 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आग आटोक्यात येताच दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
एका दिवसात किती वेळा गुळण्या कराव्यात, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर संपला, 20 जूननंतर प्रकरणांमध्ये होईल वेगाने घट