मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दर दिवशी वाहनांची संख्या राज्यात वाढत आहे. त्यापाठोपाठ शिकाऊ लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. शिकाऊ लायसन्ससाठी License अनेक खटाटोप करावे लागतात. आरटीओत जाऊन शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी License परीक्षा द्याावी लागते. मात्र आता ही परीक्षा घरबसल्या ऑनलाईनही देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार जोडणी महत्त्वाची आहे. कोणतीही अपॉईंटमेंट नाही. फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागेल. ती पूर्ण करुन परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठीच्या आरटीओतील खेपा देखील टळणार आहेत.
दरम्यान, ही नवीन संकल्पना राज्याच्या परिवहन विभागाकडून लवकरच आणली जाणार आहे. लवकरच या सेवेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करताना माहिती भरावी लागते. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून उपलब्ध सत्रानुसार अपॉईंटमेंट दिली जाते. कधीकधी या परीक्षेची तारीख लवकरच मिळते, नाहीतर कधी किमान एक महिना तरी प्रतिक्षा करावी लागते. हा खटाटोप टाळण्यासाठी किंवा अपॉईंटमेंट लवकरच मिळवण्यासाठी काही जण एजंटचीही मदत घेतात. त्यानंतर परीक्षा पास होणाऱ्यांना आरटीओकडून लायसन्स उपलब्ध होते. हा सर्व खटाटोप टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडे आधार असणे गरजेचे आहे.
परीक्षा देण्यासाठी परिवहनच्या parivahan.gov.in या संकेतस्थळावर लायसन्स सुविधा उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक एन्टर केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करु शकेल. अर्ज प्रक्रिया पार पाडताच त्याला शुल्क भरावे लागेल आणि रस्ते सुरक्षेचा एक व्हिडीओ येईल. तो पाहिल्यानंतर पुढील प्रक्रियेत त्याला परीक्षा द्याावी लागणार आहे. परीक्षा दिल्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीला परीक्षा पास झाल्याचे ऑनलाईन समजेल. तसेच मोबाईलवर संदेशही येईल. त्याचवेळी पास झालेल्यांना ऑनलाईन शिकाऊ लायसन्स उपलब्ध होणार आहे. त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी लागेल. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शिकाऊ लायसन्ससाठी घरात बसून ऑनलाईनही परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे आरटीओत येण्याची गरज लागणार नाही. ही नवीन योजना एका आठवड्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु आरटीओत येऊनही परीक्षा देण्याचा पर्यायही कायम राहणार आहे. परिवहनच्या संकेतस्थळावर परीक्षार्थींचे आधार लिंक न झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण आल्यास ती व्यक्तीला अपाईंटमेंट घेऊन आरटीओत जाऊन परीक्षा देता येणार आहे.
– अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त
संभाजीराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले – ‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’
2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती
लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या
शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण