अकोला : बहुजननामा ऑनलाईन – अकोल्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या खासदारकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर सुलताने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.
लोकसभा निवडणूकीत संजय धोत्रे विजयी झाले होते. तेथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांच्यासोबत त्यांची लढत झाली होती. मात्र या निवडणूकीच्या प्रक्रियेवर अनेक आक्षेप नोंदविण्यात आले होते. निवडणूकीत दोषपुर्ण ईव्हीएम वापरण्यात आले. त्यामुळे झालेले मतदान आणि मोजणी करण्यात आलेले मतदान यांच्यात तफावत दिसून आली आहे. त्याचा फायदा संजय धोत्रे यांना झाला आहे. असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
तर निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले नसल्याचे ज्ञानेश्वर सुलतान यांनी म्हटले आहे. संदय धोत्रे यांना ५ लाख ५४ हजार ४४४ मते पडली यात त्यांनी २ लाख ४५ हजार ५४४ मतांचे मताधिक्याने विजय मिळवला होता.