नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारी कर्मचार्यांना पगारवाढीसाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगने जारी केलेल्या आदेशानुसार, केंद्र सरकारने 2019-20 साठी केंद्रीय कर्मचार्यांचा अॅन्युअल परफॉरमन्स अॅसेसमेंट रिपोर्ट पूर्ण करण्याचा कालावधी वाढवला आहे. मार्च 2021 पर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला आहे. याआधी ही तारीख 31 डिसेंबर 2020 होती. मार्च महिन्यामध्ये देखील सरकारने अप्रेजलची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत वाढवली होती. नवीन आदेशानुसार हे स्पष्ट होत आहे, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना पगारवाढीसाठी मार्च 2021 ची वाट पाहावी लागणार आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या एका ऑर्डरमध्ये सध्याची एकूण परिस्थिती पाहता पगारवाढ निर्णय डिसेंबर 2020 वरून मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रृप ए, बी आणि सी चे कर्मचारी प्रभावित होणार आहेत. सामान्यपणे 31 मार्चला पूर्ण होणारी ही प्रक्रिया आता पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. सरकारी आदेशानुसार पगारवाढीसाठीचा फॉर्म भरण्याची मुदत 31 मे 2020 होती. मात्र लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी सरकारने हा कालावधी वाढवला आहे. आता केंद्र सरकारी कर्मचारी 31 जुलै पर्यंत हा ऑनलाइन फॉर्म भरू शकतील. त्याचप्रमाणे रिपोर्टिंग ऑफिसरला देखील सेल्फ-अप्रेजल 31 ऑगस्टपर्यंत जमा करता येईल. याआधी याची डेडलाइन 30 जून होती.