नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड, बीएसएनएल या भारत सरकारच्या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. 1 ऑक्टोबर 2000पासून या कंपनीची सुरूवात भारत सरकारने केली आहे. ही कंपनी देशव्यापी दूरध्वनी नेटवर्कच्या माध्यमातून मोबाइल कॉलिंग आणि इंटरनेट सेवा देते. सर्व टेलीकॉम ऑपरेटर आपले टेरिफ वाढविणे आणि नफा वाढविण्यात व्यस्त असताना बीएसएनएल आपले ग्राहक टिकवण्यासाठी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत आहे आणि यासारखे अनेक लाभ ग्राहकांना देत आहे.
बीएसएनएल आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना 6 पैसे प्रति पाच मिनिट लाभावर शिपिंग करत आहे आणि लँडलाइनच्या माध्यमातून कॉल केल्यावर त्यांना कॅशबॅक देत आहे. परंतु, बीएसएनएल ब्रॉडबँड प्लान मोठ्या कालावधीसाठी घेतल्यास सब्सक्रायबरना मोफत सेवेसह अनेक लाभ मिळतील. बीएसएनएलचे जे सब्सक्रायबर आपल्या वार्षिक कनेक्शन किंवा उच्च सदस्यता कालावधीसाठी अगावू रक्कम भरतात, त्यांना बीएसएनएलकडून मोफत सेवा महिन्यांचा आनंद मिळणार आहे. या ऑफरबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…
बीएसएनएल ब्रॉडबँड लॉन्ग टर्म सब्सक्रिप्शनचा लाभ
या ऑफर अंतर्गत, बीएसएनएल आपल्या ग्राहकांना 4 महीन्यांचे भाडे घेण्यात सुट देत आहे. तुम्हाला किती सुट मिळते, हे सदस्यता कालावधीवर आवलंबून आहे. जे ग्राहक आपल्या ब्रॉडबँड, DSL, BharatFibre, BBoWi-Fi ब्रॉडबँड प्लान अथवा लँडलाइन प्लान साठी 12 महीन्यांसाठी अगावू रक्कम भरतील, त्यांना एक महीन्यांची अतिरिक्त सेवा मिळणार आहे. याचा अर्थ 12 महीन्यांच्या सेवेचे पैसे भरल्यास 13 महीन्यांची सेवा मिळेल.
Visit : bahujannama.com