बहुजननामा ऑनलाईन – मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे. जगाचे लक्ष अमेरिकेतील निवडणूक निकालावर लागून होते. दरम्यान आज रात्री उशीरा निकाल लागला असून डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. जो बायडेन हे अमेरिकेचे 46 अध्यक्ष असणार आहेत.
CNN projects #JoeBiden will be the next US President pic.twitter.com/YOcgnkbolj
— ANI (@ANI) November 7, 2020