मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – BJP Leader Sudhir Mungantiwar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी तुळजाभवानी देवीसमोर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं घातलं होतं. यावरुन राज्यातील राजकारणात चर्चा व्हायला सुरूवात झाली आहे. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी देखील सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देत पुढील 25 वर्ष उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री राहणार असं म्हटलं आहे. यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar) म्हणाले की, “कॅबिनेटमध्ये एक निर्णय झाला. मोहाच्या देशी दारूला आता विदेशी दारू म्हणायचं. या सरकारकडे काहीही न करता त्याचे प्रमोशन करायची कला अवगत आहे. असं सरकार कुणालाही मुख्यमंत्री म्हणू शकतं. मात्र, सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारा मुख्यमंत्री जनतेला हवा असल्याचं,’ ते म्हणाले.
“प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. त्यात काही गैर नाही.
आपल्या राज्यात ज्या पक्षाचे केवळ 2 आमदार आहेत त्यांनाही वाटतंय की आपण मुख्यमंत्री व्हावं. “यासाठी काही देवाकडं साकडं घालतात. मात्र, ईश्वराचा अंश असलेल्या जनतेला कोण आवडतो यावर जनता मुख्यमंत्री ठरवत असते. काहींना वाटतंय राजभवनात जाऊन शपथ घेण्याची गरज नाही. ते एकमेकांना तुम्ही मुख्यमंत्री असे टोपणनावाने मिरवू शकतात,”
असा टोला देखील मुनगंटीवर यांनी लगावला आहे.
पुढे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळे यांना वाटतयं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, तर संजय राऊतांना वाटतंय की 25 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा.
मात्र, भाजपाला असं वाटतयं की, जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री असावा,” असं देखील ते म्हणाले.
Web Title :- BJP Leader Sudhir Mungantiwar | BJP leader sudhir mungantiwar criticize thackeray government over mohful alcohol
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण; आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली