मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राणे बंधू यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन खटके उडत असतात. आता पुन्हा एकदा कोकणामध्ये शिवसेना आणि राणेपुत्रांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन त्यांना फटके देण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी व्हेंलेनटाईन डे निमित्ताने शिवसेनेला 7 नगरसेवकांचे गिफ्ट देले आहे. तर दुसरीकडे त्यांचे बंधू निलेश राणे यांनी शिवराळ भाषेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती, अशी टीका केली होती. यानंतर निलेश राणे यांनी व्हिडीओ ट्विट करुन शिवराळ भाषेत उत्तर दिले आहे.
चप्पल चोर शिवसेना खासदार विन्या राऊतवर प्रतिक्रिया. pic.twitter.com/4k2NFkXNFT
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 9, 2021
निलेश राणे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, विनायक राऊत हे खासदारकीच्या लायकीचे नाहीत. भाजपच्या लाटेत दोन वेळा ते निवडून आले आहे. हिंमत असेल तर त्यांनी आता राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच विनायक राऊत यांना दोन बायका आहेत. त्यांच्यामध्ये खसदारकीचे एकही गुण नाही. हा माणूस काय बोलतो त्याला कोणताही अर्थ नसतो, फक्त टीका करण्यासाठी त्याची ओळख आहे.
मातोश्रीवरचा थापा गेला आहे, आता हा नवीन थापा असून तो चप्पला उचलायची काम करतो, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली. विनायक राऊत आता तुमची वेळ जवळ आलेली आहे. 2024 ला तुमचा बंदोबस्त करणार आणि कोकणातून कायमचे हद्दपार करणार आहे. जर भाषा बदलली नाहीतर जिथे दिसणार तिथे फटके दिले जाईल, अशी धमकी त्यांनी दिली आहे.