कल्याण : बहुजननामा ऑनलाइन – कल्याण येथील दूध व्यावसायिक याच्याकडून दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. गँगस्टर एजाज लकडावाला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा साथीदार आहे.
दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार असणारा कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहारची राजधानी पाटणा येथून जानेवारी २०२० मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. तर २०२० साली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. त्यावेळी लकडावालाने नेपाळ मार्गे पाटणा गेले होते. येथे जक्कनपूर पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. एजाज लकडावाला याच्यावर २५ हुन अधिक गुन्हे दाखल आहे. आणि लकडावाला हा तब्ब्ल वीस वर्षांपासून फरार होता. तो मुंबईतील मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक होता आणि त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर पोलिसांच्या अटकेपासून दूर राहण्यासाठी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला अमेरिका, मलेशिया, यूके, नेपाळ येथेही वास्तव्याला आहे. असे माहितीतून समोर आले आहे.
एजाज लकडावाला यांच्यावर खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहे. बिहार STF च्या सहकार्याने त्यावेळी पाटणा येथे लकडावाला याला अटक केली होती. तसेच खंडणी आणि इतर देशद्रोही खटल्यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी लकडावालाच्या मुलीला अटक केली होती. एजाजच्या मुलीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना अनेक माहिती मिळाली होती. एजाज लकडावाला ८ जानेवारी रोजी पाटण्यात येणार आहे. यानंतर पाटणा पोलिसांच्या मदतीने एजाजला अटक करण्यात आली होती.