बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस जुही चावला (Juhi Chawla) हिचा आज 53 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमात काम करणाऱ्या जुहीनं जय मेहता (Jay Mehta) सोबत लग्न केलं आहे. सध्या ती आपल्या लाईफमध्ये खूप खूश आहे. एक वेळ अशी होती जेव्हा बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) यालाही जुही खूप आवडत होती. हे खूप कमी लोकांना माहिती असावं. इतकंच नाही तर सलमान खानला जुहीसोबत लग्नही करायचं होतं. खुद्द सलमाननं एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे जो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
https://youtu.be/3HoEB4htuzE
जुहीसोबत लग्न करण्यास इच्छुक होता सलमान
जुहीच्या वाढदिवशीच आता सलमान खानचा एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. सलमान जुहीबद्दल बोलताना म्हणत आहे की, जुही खूप शानदार आणि स्वीट आहे. मी तर जुहीच्या वडिलांनाही विचारलं होतं की, तुम्ही जुहीचं लग्न माझ्या सोबत करून द्याल का. त्यांनी मात्र यासाठी नकार दिला होता.
जुहीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर जुही चावला आणि जय मेहता 1995 मध्ये विवाहबद्ध झाले होते. जय मेहता एक बिजनेसमन आहेत. त्यांच्या नात्याबद्दल जवळच्या काही मित्रांना आणि नातेवाईकांनाच माहिती होतं. मीडियापासून तिनं ही गोष्ट लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वीच तिनं याचं कारणही सांगितलं होतं. या कपलनं आता सहजीवनाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. जुहीला 2 मुलं आहेत. तिच्या मुलीचं नाव जान्हवी आणि मुलाचं नाव अर्जुन आहे.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं ते शक्य झालं नाही.