बहुजननामा ऑनलाइन टीम –गेल्या 3 वर्षापासून टेम्पल रोझ रियल इस्टेट स्कीमच्या फसवणूक प्रकरणी गेल्या 3 वर्षापासून फरार असलेल्या(Pune) आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक आहे. टेम्पल रोझ रियल इस्टेट स्कीमच्या गुन्हयाची व्याप्ती (Pune)अतिशय मोठी आहे. प्रकरणातील फरार आणि हवा असलेल्या आरोपीबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
धर्मेश नरेंद्र जोशी (51, रा. कळंबादेवी, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी धर्मेश जोशी हा मुंबई येथील कळंबादेवी परिसरात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक तुकाराम फड, कर्मचारी गुरव, शितोळे, शिनगारे आणि महिला कर्मचारी कर्णवर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक व्ही.आर. पुराणिक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.