बहुजननामा ऑनलाईन – सध्या टेलिव्हिजनवर गाजणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठीचे चौथे (Bigg Boss Marathi Season 4) पर्व यंदाच्या पर्वामध्ये अनेक अनपेक्षित गोष्टी घडताना दिसत आहेत. ज्यामुळे प्रेक्षक ही संभ्रमात आहेत. आजवर बिग बॉसच्या इतिहासात न घडलेल्या गोष्टी देखील या पर्वात पाहायला मिळत आहेत. तर आता बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 4) घरात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्याचे पाहायला मिळणार आहेत. यावेळी त्यांनी केलेली धमाल ही प्रेक्षकांना दिसणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या वेड या चित्रपटासाठी रितेश देशमुख आणि जेनेलिया खूपच उत्सुक आहेत. हे दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये सध्या व्यस्त आहेत. बिग बॉसच्या घरात रितेश आणि जेनेलिया स्पर्धकांसोबत धमाल करताना दिसणार आहेत. तर यावेळी राखी त्यांना विचारते की पहिलं प्रपोज तुम्हाला कोणी केलं. यावर जेनेलिया म्हणते “आता मला या ठिकाणी प्रपोजल पाहिजे”. तिचं हे म्हणणं ऐकत रितेश त्याच्या खास स्टाईलने तिला प्रपोज करतो. त्यानंतर घरातील स्पर्धक आणि हे दोघे ‘वेड लावलंय’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत.
आठवड्याभराच्या कार्याबद्दल चावडीवर महेश मांजरेकर सगळ्यांचाच हिशोब मांडणार आहेत.
या आठवड्यात यंदाच्या सीजन मधील शेवटचे कॅप्टनसी टास्क पार पडले आणि यावेळी स्पर्धकांनी केलेल्या
चुकीमुळे बिग बॉस सीजन जिंकणाऱ्या सदस्याला बक्षिसाची अर्धीच रक्कम मिळणार आहे.
तर चावडीवर महेश सर प्रसादला खडे बोल सुनावताना दिसणार आहे.
त्याचबरोबर आज कोणता स्पर्धक बाहेर जाणार आहे ते बघणे महत्त्वाचे असणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Bigg Boss Marathi Season 4 | bigg boss marathi 4 riteish and genelia deshmukh to enter in house for promotion of ved
हे देखील वाचा :
Pune Crime | कात्रज परिसरात महिलेसह तरुणाची एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ
Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार