बहुजननामा ऑनलाईन – शेतकऱ्यासांठी आंमलात आणलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देशातील निम्म्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत यात सात कोटी पाच लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दरवर्षी सहा हजार रुपये मदत निधी म्हणून देण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा जास्तीत जास्त फायदा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना झाला आहे, येथील सुमारे १.७ कोटी शेतकऱ्यांना या निधीद्वारे पैसे मिळाले आहेत. उर्वरित ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यांनी आपल्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे. आणि तेथेही कोणतीही मदत न मिळाल्यास थेट कृषी मंत्रालयाच्या हेल्पलाइन नंबर (011-23381092) वर संपर्क साधावयाचा आहे.
कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसर्या हप्त्याचे पैसेही पाठविण्यात येत असून बऱ्याच राज्यात नोंदणी सुरू आहे. यात पंजाबमध्ये १४ लाख ५७ हजार ३२५ शेतकऱ्यांनीही लाभ घेतला आहे. राजस्थान राज्य सरकारने केंद्र सरकारला लाभार्थी शेतकऱ्यांची यादी उशिराने पाठवूनही ४९ लाख ५३ हजार ३९५ शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर छत्तीसगडमध्ये १२ लाख २४ हजार ७५९ शेतकऱ्य़ांच्या तर मध्यप्रदेशातील ३६ लाख ४२ हजार ३३३ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. योजनेचा लाभ मिळालेल्या राज्यात उत्तर प्रदेश प्रथम सर्वात पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर हरियाणामध्ये १३, १८, ५६९ महाराष्ट्रात ६६,६९, १४९ , झारखंडमध्ये १२,४२, ७०९, गुजरातमध्ये ४४,९२,४४७ आणि कर्नाटकमधील ३४,७४, ५२७ शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान सन्मान निधी पोहचला आहे.
पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ मिळविण्यासाठी कृषी विभागात नोंदणी करावी लागते. प्रशासन याची पडताळणी करते. महसूल रेकॉर्ड, बँक खाते क्रमांक, मोबाइल नंबर वैगेरे तपशील सादर करावा लागतो. जर काही गोंधळ झाला असेल तर आपल्याला आपल्या अकाउंटंटशी संपर्क साधावा.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत