मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसला आता अनेक जोखमींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काँग्रेसला महत्वाची पाऊले उचलणे भाग आहे. त्यामुळेच काँग्रेसने विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा होण्याआधीच आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
नुकतीच दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समिती एक बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या एकूण ५७ उमेदवारांची नावे जवळपास जाहीर करण्यात आली.
जाहीर करण्यात आलेल्या नावांच्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ गटनेते के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान काँग्रेसने या उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप तरी केलेली नाही. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केल्यानंतर लवकरच काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवार ठरवण्यात आघाडी घेतल्यानंतर प्रत्यक्ष हे पाहावं लागेल.निवडणुकीतही विजय प्राप्त होईल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाव चर्चा करण्यात आली असून विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे तयारी आहेत. तसंच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
- विषयक वृत्त आरोग्यदात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत