भोकर नगर परिषदेतील नागरी सुविधा केंद्र मागील तिन दिवसापासून बंद ; नागरिकांची गैरसोय
भोकर : बहुजननामा ऑनलाईन – येथील नगर परिषदेतील सर्वच प्रकारच्या कामाचे अर्ज येथे असलेल्या नागरी सुविधा केंद्रा मार्फत भरून घेतली जातात ही सुविधा केंद्र मागील तिन दिवसापासून बंद अवस्थेत दिसून येत असल्याने नागरिकांची सगळीच कामे ठप्प झाली असून हे सुविधा केंद्र नसून हेतर असुविधा केंद्र आहे सदरील नागरी सुविधा केंद्रा बद्दल नागरिकांमधे अशा प्रकारचा रोष व्यक्त होतं.
अनेक प्रकरणाने महाराष्ट्रात चर्चेत असलेली भोकर नगर परिषद नागरिकांना त्रास देण्यात कसलीच कसर सोडत नाही आज घडीला या नगर पालिकेतील सगळीच कामे ठप्प झाली असून नगर पालिकेतील सर्वच कामे जन्म म्रुत्यु नोंद अर्ज ,नावं परिवर्तनचे अर्ज,नमुना ४३ चे अर्ज, बांधकाम परवाना अर्ज अशा सगळ्याच प्रकारचे अर्ज, प्रस्ताव घेण्याकरिता नागरिकांची सोय व्हावी याकरिता नगर परिषदे मार्फत नागरी सुविधा केंद्रा उघडली गेली या मार्फत वरील सर्वच अर्ज भरून घेतली जातात हे नागरी सुविधा केंद्र प्रतेक आठवड्यात एक-दोन दिवस बंद अवस्थेत असते आणि आता मागील तिन ते चार दिवसापासून कायमच्या बंद अवस्थेत दिसून येत आहे यामुळे नागरिकांची पूर्ण कामे ठप्प झाली असून रोज शेकडो नागरिक नगर परिषदेत कामा करिता येत असतात या सुविधा केंद्रामुळे नागरिकांना असा नाहक त्रास होतं असल्याने सद्या उन्हाचा पारा चढला असून पालिकेत येवून परत जावं लागत असल्याने उन्हाच्या पाऱ्या सारखा या नागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांचाही पारा चढला असल्याचे बोलल्या जात आहे.अशा बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या सेतू चालकांची व सदरील नागरी सुविधा केंद्राची चौकशी करावी आणि या नागरी सुविधे केंद्राचा परवाना रद्द करावा आशी मागणी नागरी सुविधा केंद्राला पाहून परत जाणाऱ्या नागरिकांची मागणी आहे. सेतू सुविधा हा धुळीने माखलेला असून त्या ठिकाणी सिमेंट ,धूळ मध्ये आलेला ग्राहक थांबण्यास व्यवस्था देखील नाही म्हणून अनेक लोक काम सुद्धा ठप्प करून टाकले आहे सेतू सुविधा ही असुविधा बनली आहे.