नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – मार्च अखेरचा ठपका महावितरण अधिकारी व कर्मचारी,लाईनमन यांच्या वर ठेऊन जीव मुठीत घेऊन एखाद्या कडे चालू असलेली नियमित वसुली करण्यासाठी अधिकारी,लाईनमन जातात पण काही जण त्यांच्या वर हल्ला चढवल्याने लाईनमन ,अधिकारी भयभीत होत आहेत नांदेड जिल्ह्यात सहाच्या वर ठिकाणी अधिकाऱ्यांना मारहाण करलेले निदर्शनास आले आहे नांदेड शहरात,अर्धापुर,नायगाव ह्या भागात तर मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे ११ मार्च रोजी शेख आक्रम शेख सरदार या वीज ग्राहकाने वसुली मोहिमेसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंता सुरेश गंधे व अन्य दोन अर्धापूर तालुक्यातील मेंढला बुद्रुक येथे २८ मार्च रोजी वीजबिल वसुली करत असताना दत्ता गणपती भरकड याने अर्धापूर शाखेतील तंत्रज्ञ मंगेश बोईनवाड यास शिवीगाळ करत जबर मारहाण केली.नांदेड शहरात १४ मार्च रोजी शिवाजीनगर परिसरातील महावितरण कार्यालयात जनमित्र राजरत्न हनुमंते यांना नगरसेवक राजू यन्नम यांच्याकडून मारहाण झाली होती.पोलीस स्टेशन ह्या सर्व जना विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.ह्या कारवाही नंतर देखील प्रशासन अधिकारी ,लाईनमन,कर्मचारी भयभीत झाले आहे अशी चर्चा ह्या भागातील नागरिकांतून सुरू आहे.