बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय जनता युवा मोर्चाचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे(Ashish Devtale) यांचे भद्रावती येथील पेट्रोलपंप चौकात भाजपा व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांतर्फे दि.4 नोव्हेंबर रोजी जंगी स्वागत करण्यात आले.
आशिष देवतळे हे नागपुरला जात असताना त्यांनी भद्रावती येथील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, नामदेव डाहुले उपस्थित होते. तसेच भद्रावती येथील भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, आशिष पोटे, केतन शिंदे, अमर महाकुलकर, कामरान खान,तोसिफ शेख, अक्षय बोढाले व इतर स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पञकारांशी बोलताना देवतळे म्हणाले की, भाजपा हा सोशित, पिडीत, गरीब यांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. त्यामुळे अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.सर्व सामान्य जनता व शेतकर्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा लढा बुलंद करू असेही ते म्हणाले.