भोकर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच मा. अरुण डोंगरे (निवडणूक निर्णय अधिकारी, १६-नांदेड लोकसभा मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी नांदेड) यांचे मार्गदर्शनप्रमाणे पवन चांडक (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-भोकर विधानसभा मतदारसंघ) यांनी दिलेल्या सूचनांनुसार सुजित नरहिरे (तहसीलदार अर्धापुर) यांनी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघात मौ. देगाव बु., ता. अर्धापुर या ठिकाणी सखी मतदान केंद्र स्थापन केले आहे सदरील मतदान केंद्रावर.मतदान केंद्राध्यक्ष – मेघा एस. डांगे, मतदान अधिकारी 1 – नासिम शेख, मतदान अधिकारी 2 – चंद्रकला ए. कदम, मतदान अधिकारी 3 – विद्या बी वांगे, पोलीस शिपाई – सुजाता गायकवाड, शिपाई – पुष्पा कपाटे ह्या सर्व महिला अधिकारी/कर्मचारी आहेत… तसेच या झोनचे झोनल अधिकारी – पूनम बी पवार* पण महिला झोनल अधिकारी आहेत.(BLO)बी एल.ओ. – रोहीणी टी मुघोळकर तलाठी – स्वाती एस शेलगावकर ह्या आहेत. व तसेच उमेदवाराचे प्रतिनिधी पण महिलाच आहेत – सिमा तिडके, शिला तिडके व प्रियांका जाधव ह्या आहेत.