नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर मार्चच्या सुरूवातीस बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असल्यास, शक्य तितक्या लवकर ते करुन घ्या. मार्चमध्ये होळीच्या सणाजवळ बँक सेवा सलग 6 दिवस बंद राहू शकते. वास्तविक मार्चमध्ये संप व सुट्टीमुळे 10 मार्च ते 15 मार्च या कालावधीत बँकांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. होळीच्या सणामुळे 10 मार्च रोजी बँका बंद राहतील. याशिवाय 11 ते 13 मार्च या कालावधीत बँक संघटना तीन दिवसांच्या संपाची हाक देऊ शकतात. 14 मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे आणि 15 मार्चला रविवारची सुट्टी असेल. 10 मार्चपासून बँका सलग 6 दिवस बंद राहतील, परंतु त्याआधी 8 मार्च रोजी रविवार आहे.
म्हणजेच मार्चच्या दुसर्या आठवड्यात बँका फक्त एका दिवशी म्हणजेच 9 मार्च रोजी उघडल्या जातील. मिळालेल्या माहितीनुसार, बँक संघटना 11 ते 13 मार्च दरम्यान तीन दिवस संप पुकारू शकतात. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी बँक कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर गेले होते. त्यांचे म्हणणे आहे की अद्याप कर्मचार्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचार्यांच्या वेतनात दर पाच वर्षांनी सुधारणा केली जाते. गेल्या वेळी बँक कर्मचार्यांच्या पगारामध्ये 2012 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानंतर, 2017 मध्ये पुनरीक्षण घेणे बाकी आहे. यासाठी कर्मचारी संपावर आहेत.
याशिवाय बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टी देण्यात यावी, अशी संघटनांकडूनही मागणी आहे. बँक कर्मचार्यांच्या इतरही काही मागण्या आहेत, जसे की मूलभूत वेतनासह विशेष भत्ता, कौटुंबिक पेन्शनमध्ये सुधारणा इ. फेब्रुवारीमध्ये 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान बँका सलग बंद आहेत. 21 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी महाशिवरात्रीच्या उत्सवामुळे बँकांना सुट्टी होती. यानंतर, 22 फेब्रुवारी रोजी महिन्याचा चौथा शनिवार आणि 23 फेब्रुवारी रोजी रविवार बँकेला सुट्टी असते.