नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यात सोन्याचे भाव सारखेच वर-खाली होत असून अगोदर अमेरिका-इराण आणि नंतर अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. १० ग्रॅमचा भाव ४२ हजार पर्यंत पोहोचला असून तणाव कमी झाल्यावर पुन्हा ३९ हजारवर पोचला होता. तर जाणकारही सोन्याच्या भाव खाली येतील अशी शंका व्यक्त करत होते. पण आता परत एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत.
यामुळे वाढत आहे भाव
चीनमधील कोरोना विषाणू जगातील इतर देशातही पसरला असून जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. याबद्दल बरेच देश सतर्क असून जगातील शेअर बाजार कोरोना विषाणूमुळे घाबरले आहेत. याच कारणामुळे कमोडिटी मार्केटमध्ये हालचाली खूप वेगवान होत असून भारतीय बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३ हजार रुपयांच्या पुढे गेली असून आता लवकरच १० ग्रॅम प्रति किंमतीचे सोने ४५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
सोमवारी जागतिक पातळीवरील सकारात्मक कल दरम्यान सोन्याचा भाव सोमवारी ४०६ रुपयांनी वाढून ४३,२६९ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा जूना करार ४०२ रुपयांनी किंवा ०.९५ टक्क्यांनी वाढून ४३,२६९ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला असून त्यात १२५ लॉटची उलाढाल झाली आहे. त्याचप्रमाणे एप्रिल मधील सोन्याचा करार ४०१ किंवा ०.९४ टक्क्यांनी वाढून ४३,०६७ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्यात २,११७ लॉटची उलाढाल झाली असताना जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.९३ टक्क्यांनी वधारून ते १,६६४.२० डॉलर प्रति औंस झाले.