आग्रा : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात आले असून ते त्यांची गाडी बीस्टमधून प्रवास करत असले तरी त्यांना ताजमहाल येथे पायीच चालावे लागणार आहे. तेही काहीच पाऊले नाही तर दीड किमी चालावे लागणार आहे. येथे गोल्फ कार्ट फोरकोर्ट पर्यंतच येऊ शकते. त्यानंतर तिथून त्यांना पायी प्रवास करावा लागेल.
जगातील सातवे आश्चर्य आणि प्रेमाची निशाणी ताजमहाल पाहण्यासाठी ट्रम्प हे त्यांची पत्नी मेलानिया यांना दीड किमी चालावे लागणार आहे. फोरकोर्ट वर गोल्फकोर्टपासून उतरल्यावर त्यांना रॉयल गेट, सेंट्रल टॅंक, चमेली फर्श, मुख्य मकबऱ्यापर्यंत चालावे लागणार असून दोन्ही बाजूने १३५० मीटर अंतर आहे. आणि हे अंतर त्यांना चालतच पार करावे लागेल.
अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सींनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या चालण्यावर नजर ठेवली आहे. ते ताजमध्ये ७८ पायऱ्या चढतील आणि उतरतील, याचा तपशील ठेवला आहे. तसेच २२.७८ चौरसचा सेंट्रल टॅंक आणि डायना सीटवर पोहोचण्यासाठी ७ पायऱ्या चढाव्या लागतील.