नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आज (२४ फेब्रुवारी) आपली पत्नी आणि मुलीसह भारत भेटीवर आले आहेत. त्यांचा भारतात २ दिवसांचा दौरा आहे. तुम्ही कदाचित ट्रम्प यांना एक राजकीय व्यक्ती म्हणून ओळखत असाल,पण ते एक मोठे उद्योगपती देखील आहेत. ट्रम्प यांचा रियल ईस्टेट मध्ये मोठ्या व्यवसाय आहे. त्याशिवाय इतर व्यवसायात देखील त्यांनी पैसे लावले आहेत.
भारतात देखील मोठा व्यवसाय
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ट्रम्प यांनी उत्तर अमेरिकेनंतर रिअल इस्टेटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक कुठे केली आहे, तर ती भारतात आहे. आता आपण समजू शकता की ट्रम्प यांच्या भारत भेटीला दोन देशांच्या राजकारणाच्या दृष्टीने तसेच त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना किती महत्त्व आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे साम्राज्य
‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या 500 व्यवसायिक घटकांचा समूह आहे. यापैकी 250 हून अधिक कंपन्या ट्रम्प हे नाव वापरतात. ट्रम्प यांची आजी एलिझाबेथ ख्रिस्त ट्रम्प आणि वडील फ्रेड ट्रम्प यांनी ई ट्रम्प म्हणून याची स्थापना केली होती. कंपनीचे वार्षिक उत्पन्न वर्षाकाठी सुमारे 5000 कोटी रुपये आहे. भारतात ट्रम्प यांचे रियल इस्टेट प्रोजेक्ट्स ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’ ने २०१३ मध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले. भारतीय कंपन्यांसोबत मिळून ५ लग्जरी रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट्स लॉन्च केले. ट्रम्प यांच्या सोबत भारतीय कंपन्या लोढा ग्रुप , पंचशील रियल्टी, एम3एम, ट्रिबेका, यूनिमार्क तथा आइरियो काम करीत आहेत. भारतात ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’ सोबत काम करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की ते केवळ ट्रम्प यांच्या ब्रँडच्या नावावर ते फक्त 40% जादा शुल्क आकारण्यास सक्षम आहेत आणि हा ब्रँड भारतात चांगली कामगिरी करत आहे.
जाणून घ्या ट्रम्प यांच्या बद्दल :
ट्रम्प टॉवर्स , पुणे
इंडिया पार्टनर – पंचशील रियल्टी
लोकेशन- कल्याणी नगर
माजले – 23 मजल्याचे 2 टावर्स
एकूण अपार्टमेंट्स- सिंगल फ्लोर वाले 46 अपार्टमेंट्स
लॉन्च- 2012
कंप्लीशन- 2019
कीमत- 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक
खास- 13,500चौरस फूट आर्ट गॅलरी आणि मैदानी लॅप ब्रिज
ट्रम्प टॉवर, मुंबई
इंडिया पार्टनर- लोढ़ा ग्रुप
लोकेशन- गोल्डन माइल, वरळी
माजले – 75 माजले
एकूण अपार्टमेंट्स- 300
लॉन्च- 2013
कंप्लीशन- 2019
किंमत – 9 कोटी रुपयांपासून सुरु
खासियत- प्राइवेट जेट सर्विस, ट्रंप कार्ड
ट्रम्प टॉवर, कोलकाता
इंडिया पार्टनर – युनिमार्क ग्रुप, आरडीबी ग्रुप आणि ट्रायबिका डेव्हलपर
ठिकाण – ईस्टर्न मेट्रोपॉलिटन बायपास स्ट्रेच
मजला – 39 मजले
एकूण अपार्टमेंट्स – 140
लाँच – ऑक्टोबर 2017
किंमत- 3.75 कोटी पासून सुरू
कंप्लीशन – 2020
खासियत – हीटेड पूल, सन टेरेससह रूफटॉप स्काय क्लब
ट्रम्प टॉवर गुरुग्राम (ट्राइबिका ट्रम्प टावर्स, गुडगाव)
इंडिया पार्टनर – एम 3 एम इंडिया आणि ट्राइबिका डेव्हलपर
स्थान – सेक्टर 65
मजला- 50 मजल्यांचे 2 टॉवर्स
एकूण अपार्टमेंट्स – 258
लाँच – जानेवारी 2018
पूर्ण – मार्च 2023
किंमत- .5.5 कोटी रुपयांपासून सुरू
खासियत – खासगी लिफ्ट, 22 फूट उंच डबल उंचीचे लिव्हिंग रूम
आइरियो ट्रम्प टॉवर गुरुग्राम
इंडिया पार्टनर- आइरियो
लोकेशन- गोल्फ कोर्स एक्सटेंशन रोड