नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती एनडीसी कॉलनी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमात बोलताना पिंपळगाव सोसायटीचे माजी चेअरमन सतीश मोरे म्हणाले की, संपूर्ण आयुष्यात सेवा करण्याचे काम संत सेवालाल महाराज यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या कामाचे आपण योग्य अनुकरण करून जीवनात वाटचाल केली, तर समाजाला नक्कीच नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्रशांत घोडके, केशव बनकर, अश्विन पाटील, मिथुन पवार, शिवाजी पवार, चिंधू काळे, संदीप पवार उपस्थित होते. श्रीनगर येथे शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बंजारा क्रांती दलाचे मिथुन पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जयंती अभिवादन कार्यक्रमास खेमचंद पवार, नामदेव राठोर, महेंद्र नाईक, किशोर जाधव, लक्ष्मण पवार, विनोद जाधव, बसू पवार, संदीप पवार, विजय जाधव, दिलीप राठोड, रामेश्वर राठोड, अनिल राठोड, राजू राठोड, जितू जाधव, साहेबराव चव्हाण, महेंद्र पवार आदी उपस्थित होते.