लातूर : बहुजननामा ऑनलाईन – श्रीनगरनजीकच्या पुलवामा येथे गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भीमराज युवा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भीमराज युवा संघटनेचे अध्यक्ष विनय जाकते, जिल्हाध्यक्ष सतीश सरवदे, उपाध्यक्ष जय ढगे, युवा जिल्हाध्यक्ष संजय काळे, सुनील फुलारी, परशुराम रसाळ, चेतन शिंदे, पांडुरंग गायकवाड, सुनील शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘मातृभूमी दक्षता’तर्फे हल्ल्याचा निषेध पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आतंकवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. हा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मातृभूमी दक्षता मुव्हमेंटच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर ॲड. लालासाहेब शेख, इलियास इनामदार, साहेबअली सौदागर आदींच्या आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.