बुलडाणा बहुजननामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक माहिती मिळावी म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण घेण्याकरता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु झाली आहे. सदर अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी ,विस्तार पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करण्यात आलेला आहे.
या योजनेसाठीचे अर्ज १ जुलै ते ३० च्या दरम्यान स्वीकराले जाणार असून या अर्जा व्यतिरिक्त दुसऱ्या अर्जाचा नमुना स्वीकारण्यात येणार नाही . या योजनेसाठी अर्जदार हा अनुसूचित जाती तसेच दारिद्रय रेषेखालील असावा. या योजनेमध्ये ३ टक्के अपंग व ३०टक्के महिलांचा समावेश असणार आहे. अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने सदर योजनेचा लाभ घेतला असल्यास पुन्हा याचा लाभ घेता येणार नाही.
अर्जदारास १ मे २००१ नंतर तिसरे अपत्य नसावे ,तसा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा. अर्जांसोबत नुकताच काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा. आधारकार्डची साक्षांकित प्रत ज्या बँकेशी संलग्न केलेले आहे. त्या बँकपासबुकची सत्यप्रत सोबत जोडावी.
काय आवश्यक ?
अर्ज १ जुलै ते ३० च्या दरम्यान स्वीकराले जातील
विहित नमुन्यात अर्ज असावा
अर्जदार हा अनुसूचित जाती तसेच दारिद्रय रेषेखालील असावा
योजनेमध्ये ३ टक्के अपंग व ३०टक्के महिलांचा समावेश
अर्जदारास १ मे २००१ नंतर तिसरे अपत्य नसावे तसा ग्रामसेवकाचा दाखला
आधारकार्डची साक्षांकित प्रत आणि बँकपासबुकची सत्यप्रत सोबत