मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मोदींच्या आजच्या दिनक्रमाची मोठी चर्चा झाली. अनेक मान्यवरांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ट्विट अत्यंत वादग्रस्त आणि चर्चेचे ठरले आहे. या ट्विटवरून नेटीझन्सनी अमृता यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
काय म्हटल्या मिसेस CM :
अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ (Father of our Country) असा केला. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देतात, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं म्हटलं आहे. भारतात महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असं संबोधलं जात असताना मोदींचा तसा उल्लेख केल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मोदींची तुलना थेट महात्मा गांधींशी करत असल्याने अमृता फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुरु झाली आहे.
https://twitter.com/fadnavis_
अमृता यांनी एका रिअॅलिटी शोच्या ‘ओ रे मनवा तू तो बावरा है’ या त्यांनी स्वतः गायलेल्या गाण्याचा एक व्हिडीओदेखील या ट्वीटसोबत शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर रीट्वीट करत, त्यावर कमेंट्स करत नेटीझन्सनी फडणवीस यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी यावर संताप व्यक्त करत अमृता यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
Visit : Bahujannama.com
- ‘या’ १० सौदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा