नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप नेहमीच चर्चेत असतात. आपल्या कामाव्यतिरीक्त आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेचा हिस्सा बनलेले असतात. त्यांचं अनेक महिलांशी नातं राहिलं आहे ज्या प्रकरणांची आजही चर्चा होताना दिसते. नुकतेच ते आपल्या एका जुन्या विधानाला घेऊन चर्चेत आले आहेत. हे विधान त्यांची मुलगी इवांका बद्दलचे आहे.
ट्रंप आपली मुलगी इवांकाच्या सौंदर्याचीही खूप स्तुती करत असतात. इवांकाही खूप सुंदर आहे जी आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 2006 साली ट्रंप यांनी आपली मुलगी इवांकाबद्दल जे विधान केलं होतं त्याची खूप चर्चा होताना दिसली होती. ट्रंप म्हणाले होते की, “तिची फिगर कमाल आहे. जर ती माझी मुलगी नसती तर कदाचित मी तिला डेट करत असलो असतो.”
इवांकाचा 1996 सालचा एक फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. या फोटोत इवांका आपल्या वडिलांच्या मांडीवर बसल्याचे दिसत होते. ते जिथे बसले होते तिथे दोन पोपटांची मुर्ती होती ज्याच्या तोंडातून पाणी बाहेर पडत होतं. हा फोटो तेव्हाचा होता जेव्हा इवांका 15 वर्षांची होती. मिनी स्कर्ट घातलेली इवांका या फोटोत खूपच सुंदर दिसत होती. हा फोटो खूप काळ चर्चेत राहिला होता.
Visit : bahujannama.com