मोहाली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर आता सर्वांचे लक्ष मोहालीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यावर लागले आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुसरा टी 20 सामना सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.
दक्षिण आफ्रिका टी 20 आणि कसोटीसाठी वेगवेळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधार पद असेल. दरम्यान टी 20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहलीच असणार आहे.
अनेकांना सामना पाहायचा असतो परंतु त्यांना ते पाहणं शक्य होत नाही अशा चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सामन्यादरम्यान जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घराबाहेर असाल तर काळजी करू नका. तुमच्याकडे जिओचं सीमकार्ड असेल तर स्मार्टफोनवरच हा पूर्ण सामना पाहू शकता. यासाठी Jio TV अॅप तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही जिओ टीव्हीवर 3 टी20 क्रिकेट सामने आणि 3 कसोटी सामने मोफत पाहू शकता. इतकेच नाही तर, लाईव्ह सामन्यादरम्यान Jio Cricket Play Along गेम खेळून बक्षिसे जिंकण्याचीही संधी आहे. यासाठी फक्त तुमच्याकडे प्राईम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
visit : bahujannama.com