नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अमेरिकेने बगदाद विमानतळावर हवाई हल्ला केला आहे. यासंबंधित माहिती इराकी मिलिशियाने दिली आहे. इराकी मिलिशियाने सांगितले की, या हवाई हल्ल्यात इलिट कुड्स फोर्सचे प्रमुख, इराणी मेजर जनरल कासिम सुलेमानी, इराकी लष्करी कमांडर अबू महदी अल-मुहंडिस यांच्यासह आठ जण ठार झाले आहेत. तसेच इराण समर्थीत मिलिशियाचे प्रवक्ते अहमद अल असदादी यांनी संगितले कि, “मुजाहिद्दीन अबू महदी अल-मुहंडिस आणि कासेम सोलेमानी यांना ठार मारण्यासाठी अमेरिकन आणि इस्त्रायली शत्रू जबाबदार आहेत.”
मोठी कारवाई करण्याची शक्यता :
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यामुळे मध्य पूर्व मध्ये वेगळे वळण घेतले आहे, तसेच इराण आणि लष्करी सैन्याकडून इस्त्रायली आणि अमेरिकन हितसंबंधांच्या विरोधात मध्य पूर्वेत प्रतिउत्तर देत गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीएमएफने बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई हल्ल्यासाठी अमेरिकेला लक्ष्य केले आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणकडून याबाबत त्वरित कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. दरम्यान, इराणशी निष्ठा असणार्या दोन लष्करी नेत्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, ज्यात कटब हिज्बुल्लाहसोबत एक अधिकाऱ्याचाही साममवेश आहे. जे या आठवड्यातील अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यात सामील होते.
Gen. Qassim Soleimani, head of Iran's elite Quds force, has been killed in an airstrike at Baghdad's airport. Strike also killed Abu Mahdi al-Muhandis, deputy commander of militias known as Popular Mobilization Forces. PMF blamed United States for the airstrike: Associated Press
— ANI (@ANI) January 3, 2020
ज्येष्ठ नेत्याने सांगितले कि, सुलेमानी यांचा मृतदेह त्याच्या अंगठीने ओळखला गेला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्या मृत्यूच्या अनेक वेळा अफवा पसरवण्यात आल्या. ज्यात २००६ च्या विमान अपघातात वायव्य इराणमधील इतर लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू आणि २०१२ मध्ये दमास्कसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या नंतर सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असदच्या यांच्या सहकाऱ्यांच्या ठार मारण्यात आलेल्या घटनांचा समावेश होता.
यूएस दूतवास बंद :
काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकी दूतावासावर लोकांच्या जमावाने हल्ला केला. यासाठी अमेरिकेने इराकला लक्ष्य केले. इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाने १ जानेवारी रोजी पुढील आदेश येईपर्यंत आपली सर्व सार्वजनिक वाणिज्य दूताची कामे निलंबित करण्याची घोषणा केली. दूतावासावर इराण समर्थकांनी केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दूतावासाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, अमेरिकेच्या कॅम्पसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सर्व सार्वजनिक समुपदेशक कारवायांना स्थगिती देण्यात आली आहे. “भविष्यातील सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. अमेरिकन नागरिकांना दूतावासात संपर्क न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” अशी माहिती मिळाली आहे.
Visit : bahujannama.com