All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा; ऑईल इंडिया लिमिटेड संघाला विजेतेपद

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – All India Public Sectors Football Tournament | भारतीय खाद्य निगम (फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आणि एडएसपीसी, पश्चिम यांच्या तर्फे आयोजित अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धेत ऑईल इंडिया लिमिटेड संघाने एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इएसआयओ) संघाचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (All India Public Sectors Football Tournament)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्री शिवछत्रपती क्रिडा संकूल, बालेवाडी येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑईल इंडिया लिमिटेड संघाने एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. सामन्यामध्ये दोन्ही संघांनी आक्रमक सुरूवात केली. ऑईल इंडिया संघाच्या आघाडीच्या फळीने इएसआयओ संघाच्या गोलकक्षामध्ये मुसंडी मारली होती. पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. पुर्वार्धातील जादाच्या वेळेमध्ये सिरनदीप मोरे याने गोल करून ऑईल इंडिया संघाचे खाते उघडले.
उत्तरार्धात ऑईल इंडिया संघाने आणि एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. ऑईल इंडिया संघाने मिळवलेली १-० अशी आघाडी कायम ठेवली आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
पियुष भंडारी आणि मोनटोस माझी यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने
एअर इंडिया संघाचा २-० असा पराभव करून तिसर्या क्रमांकाचे पद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एफसीआय पश्चिम विभागीय कार्यकारी संचालक आर.पी. सिंग आणि एफसीआय महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक मनमोहन सिंग सारंग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ईएसआयसी पुणेचे उपसंचालक एच.के. पांड्ये, एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना,
एफसीआय एआयपीएस कन्ट्रोल बोर्डचे मुख्य रमेश सचदेवा, अखिल भारतीय १९ वर्षाखालील महिला फुटबॉल प्रशिक्षक मोहम्मद कादीर शेख,
फुटबॉलपटू एम.जी. पाटील, राष्ट्रीय हॉकीपटू हमीद उल्लाह खान आदि मान्यवर उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्पर्धेचा निकालः अंतिम सामनाः
ऑईल इंडियाः १ (सिरनदीप मोरन ४८ मि.) वि.वि. एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः ०;
तिसर्या क्रमांकासाठी सामनाः
फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः २ (पियुष भंडारी १८ मि., मोनटोस माझी २७ मि.) वि.वि. एअर इंडियाः ०;
Web Title :- All India Public Sectors Football Tournament | All India Public Sectors Football Tournament Oil India Limited team won the title
हे देखील वाचा :
Vikram Kakade | व्हीएस टायगर्सचा जॅग्वार्सवर दहा गड्यांनी विजय; विक्रम काकडे सामनावीर
Pune Accident News | पुणे-नगर रोडवर डॉक्टर दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, महिला डॉक्टरचा मृत्यू
Comments are closed.