हैदराबाद : वृत्तसंस्था – वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणारे एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती खालावली आहे. उपचारासाठी त्यांना लंडनच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती त्यामुळे उपचारासाठी ते लंडनला गेले आहेत. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे वृत्त आहे. याबाबत अकबरुद्दीन यांचे मोठे भाऊ यांनी याविषयी सांगताना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ईद मिलाप या कार्यक्रमाप्रसंगी असुद्दीन ओवैसी यांनी ही माहिती दिली.
एमआयएमचे असुद्दीन ओवैसी हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी हैदराबाद शहरातील आमदार आहेत. अकबरुद्दीन यांना मागील काही वर्षात चंद्रागुगट्टू येथे उपचार करण्यात येत होते. परंतु, त्यांच्या प्रकृती स्वास्थाचा विचार करता पुढील चांगल्या उपचारासाठी ते लंडनला रवाना झाले.