बावडा : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेत चांगलाच दरारा निर्माण करणाऱ्या करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभेवर लक्ष करण्याचे ठरवले आहे त्यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हातील जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गट पोटनिवडणुकीत चक्क आम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार न देता तटस्थ भूमिकेत राहणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष शरद चितारे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकीत वंचित ने काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या चर्चा माद्यमात सुरु होत्या त्यानंतर आता तटस्थ राहणार असल्याचे वंचित तालूकाध्यक्ष चितारे यांनी स्पष्ट केले आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी होत असलेल्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तटस्थ राहणार असून उमेदवार उभा करणार नाही. आमचा कुणालाही पाठिंबा नसेल, असे यावेळी चितारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बावडा- लाखेवाडीच्या पोटनिवडणुकीत वंचितने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे गटात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.