मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपली ताकत दाखवणाऱ्या तसेच या निवडणुकीत जवळपास ४१ लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने येणाऱ्या विधानसभेसाठी रणनीती आखली असून काही दिवसांपूर्वी एकत्रितपणे लढविण्याचा मुद्यावर पुण्यातील बैठकीत चर्चा केली होती. यातच एक वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखती प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभासाठी मायावती पॅटर्न वापरणार असल्याचा दावा केला आहे.
या आधी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ब्राह्मण वर्गाला पक्षात स्थान दिले होते. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हटले की, महाराष्ट्रात ब्राह्मण वंचित असतील तर त्यांना आमच्या पक्षात स्थान देऊ तसेच येणाऱ्या विधानसभेसाठी तिकीटही देऊ, जे वंजित आहेत आणि ज्यांनी आधीचा आपला पक्ष सोडण्याचं कारण दिलं आहे त्या सर्वांना आमच्या पक्षाची दारं खुली असल्याचेही ते बोलले. आगामी विधासभेत वंचित बहुजन आघाडी ही प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल, असंही ते म्हटले.